“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसपाची धडाकेबाज तयारी; कार्यकर्त्यांना शेजेंचे एकजुटीचे आवाहन”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : बहुजन समाज पार्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अंजनगाव सुर्जी येथे पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीत पक्षाचे दर्यापूर–अंजनगाव विधानसभा अध्यक्ष विनायक शेजे यांनी संघटनात्मक सज्जतेवर खास भर देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांचे खरे रणांगण आहे. पाच वर्षांपासून राबणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची ही लढत असते. त्यामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या तिन्ही पातळ्यांवरील आगामी निवडणुका बसपा ताकदीने लढवणार आहे,” असे शेजे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक घटकांना न्याय मिळवून देणे ही बसपाची मूलभूत बांधिलकी आहे. या ध्येयासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीस सामोरे जावे.”

बैठकीस जिल्हा महासचिव मनोज मेळे, प्रभारी विजय रायबोले, बामसेफ थिंक टँकचे प्रा. डी. एन. हीरे, विधानसभा उपाध्यक्ष मनोहर बोरकर, तसेच भाऊराव वानखडे, चंद्रशिल बरडे, दानभद्र रायबोले, राहुल इंगळे, निरंजन इंगळे, विनायक धुमाळे, शुद्धोधन सावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!