अंजनगावात शिवसेनेची शक्तीगर्जना : डकरे दाम्पत्याच्या प्रवेशाने निवडणुकीत नवी वाताहत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक २०२५च्या उंबरठ्यावर शिवसेना (शिंदे गट) तर्फे प्रभा मंगलमच्या सभागृहात झालेला निवडणूक आढावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा हा केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता, तर तो जनसमुदायाच्या उसळलेल्या उत्साहाचा, निष्ठेच्या लाटेचा आणि आगामी संघर्षाची घोषणा करणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचा प्रत्यय होता. शिवसैनिकांच्या प्रचंड गर्दीने सभागृह दणाणून गेले आणि वातावरण घोषणांनी भारून गेले.

वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात शिवसेनेचे अस्तित्व नव्या दमाने धगधगताना दिसले. मंचावर ज्येष्ठ नेत्यांची दिमाखदार उपस्थिती कार्यक्रमाला अधोरेखित करत होती. माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, विभागीय संघटक उपनेते ज्ञानेश्वर धाणे पाटील, सहसंपर्कप्रमुख श्याम देशमुख तसेच जिल्हा-तालुक्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षशक्तीचे प्रदर्शन अधिक भक्कम केले.

या तेजस्वी वातावरणात अंजनगावचे प्रतिष्ठित चिकित्सक डॉ. अतुल डकरे व डॉ. स्पृहा डकरे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश करताच सभागृहात उत्साहाची नवी लाट उसळली. त्यांच्या प्रवेशाची घोषणा क्षणातच शहरात चर्चा रंगवून गेली. यावेळी डॉ. स्पृहा डकरे यांना नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून अधिकृत मान्यता देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

डकरे दाम्पत्याच्या मागे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आणि पक्षप्रवेशाचा सोहळा सामूहिक शक्तिप्रदर्शनात परिवर्तित झाला. या लोंढ्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे बळ अधिक दृढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

अंजनगाव सुर्जीतील राजकीय समीकरणे या प्रवेशाने नव्या घडामोडींना सुरुवात करणार असून येणारी निवडणूक अधिक रंगतदार, अधिक चुरशीची आणि अधिक उत्साही होणार, याबाबत तिळमात्र शंका नाही.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!