“स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या साक्षीने उभा राहिलेला प्रियलचा गौरवक्षण”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : स्थानीय श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एनसीसी विभागाची छात्रा कु. प्रियल धांदे हिने आपल्या कठोर परिश्रम, शिस्त आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता परेडेत उल्लेखनीय योगदान नोंदवले.

गुजरात येथील केवडिया – स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती वर्ष निमित्त मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत “विविधतेतून एकता” या संकल्पनेवर आधारित भव्य एकता परेड ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली. या प्रतिष्ठित परेडीसाठी देशभरातून उमेदवार निवडताना अनेक कठोर चाचण्यांतून मार्ग काढत कु. प्रियल धांदे हिने आपली योग्यता सिद्ध केली.

परेडमधील तिच्या शिस्तबद्ध सहभागातून देशभक्तीची जाज्वल्य भावना व्यक्त झाली. तिच्या या यशाची दखल घेत महाविद्यालयात शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बशिष्ठ चौबे यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. डॉ. सत्येंद्र गडपायले यांनी एनसीसीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी, व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रसेवेतील योगदानाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला एनसीसी अधिकारी श्री. अनिल ताडे, हर्षकुमार चंदनपत्रि, महाविद्यालयातील शिक्षक–कर्मचारी तसेच एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!