नाशिक जिल्ह्यात आज 11 नगरपरिषदांसाठी होतंय मतदान; बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरा-नवरीनं बजावला मतदानाचा हक्क

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिक जिल्ह्यात आज आज 11 नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर येवल्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरा-नवरीनं मतदानाचा हक्क बजावला.

 

नाशिक : जिल्ह्यात आज 11 नगरपरिषदांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 11 नगराध्यक्ष पदांसाठी 56 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदासाठी 1058 उमेदवारांमध्ये चुरस रंगणार आहे.आज मतदानानंतर उद्या बुधवारी (3 डिसेंबर) मतमोजणी होणार आहे. तब्बल 8 वर्षानंतर नगरपालिकांना नवा कारभारी मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यात 3 लाख 72 हजार 543 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भगूर, त्रंबकेश्वर, इगतपुरी, येवला, पिंपळगाव, चांदवड, सटाणा, मनमाड, येवला आणि नांदगाव इथं मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान ओझर, चांदवड आणि सिन्नर येथील एकूण सात प्रभागात 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उर्वरित नगरपरिषदांसाठी 416 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येत आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी अडीच हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या आज मतदान झाल्यावर उद्या सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

दुसऱ्या केंद्रावर डुप्लिकेट असा शिका : निवडणूक विभागाने दुबार मतदार असलेली नावं निश्चित करून मधल्या काळात त्या मतदारांकडून कुठल्यातरी एका ठिकाणीच यादीत नाव ठेवण्यासाठी अर्ज भरून घेतले आहेत. उमेदवारांना त्यांचं नाव निश्चित केल्यानंतर दुसऱ्या यादीत डुप्लिकेट असा शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे मतदार दुसऱ्या केंद्रावर गेल्यास त्याला तिथं मतदान करता येणार नाही.

मतदानासाठी पगारी सुट्टी : मतदान क्षेत्रातील तसेच मतदान क्षेत्राबाहेर राहणाऱ्या मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूर्ण सुट्टी देणं शक्य नाही अशा आस्थापनांना जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांची परवानगी घेणं बंधनकारक आहे. मात्र, त्यातीलही कामगारांना देखील दोन ते तीन तास मतदानासाठी सोडावे लागेल. असे आदेश कामगार उप आयुक्त विकास माळी यांनी दिले आहेत.

 

वधू-वरानं केलं मतदान : दरम्यान, आज बोहल्यावर चढण्यापूर्वी येवल्यात नवरा-नवरीनं मतदानाचा हक्क बजावला. शुभदा शिंदे असं मतदानाचा हक्क बजावलेल्या नवऱ्या मुलीचं नाव आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!