लखाडजवळ दोन अवजड वाहनांची समोरासमोर धडक; अंजनगाव–अकोट मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी–अकोट मुख्य मार्गावर लखाड गावाच्या हद्दीत आज दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अवजड वाहनांचा भीषण अपघात घडला. सिमेंटचे जलवाहिनी पाईप वाहतूक करणारा कंटेनर आणि कापूस भरून अंजनगाव सुर्जीकडे येणारा ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
धडकेचा आवाज इतका तीव्र होता की काही क्षणातच नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्याच्या मध्यभागी वाहने अडकल्याने काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकांना बाहेर काढून त्वरित अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवून पंचनामा केला. काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!