रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली आहे.

 

मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे (Ritu Tawade Mumbai mayor) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी (Sanjay Ghadi) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी उपमहापौर असणार आहेत. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. 11 फेब्रुवारी मुंबई मनपा महापौर निवड होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत.

 

नावाची घोषणा होताच रितू तावडे काय म्हणाल्या?

मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असं मुंबईच्या नव्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे म्हणाल्या.

कोण आहेत रितू तावडे? (Who Is Ritu Tawade)

  • रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत.
  • 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता.
  • 2017 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या.
  • यानंतर 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे.
  • त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.
  • त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा

दुसरीकडे, मुंबई मनपामध्ये शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असणार आहे. शिंदे गटाकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाकडून मुंबईत सुद्धा पदांची खांडोळी पायंडा कायम ठेवला आहे. संजय घाडी यांना सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, अशी घोषणा शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली.

 

कोण आहेत संजय घाडी?

संजय घाडी 1988-89 पासुन शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख, सन 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते व सध्या शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. सन 2017 ते 2022 शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. मुलगा सुयश युवासेना विधानसभा समन्वयक आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार?

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार? याची चर्चा रंगली होती. भाजपचा उमेदवार मराठी असणार की अमराठी असणार?? अशीही चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजपनेे ठाकरेंना कोणतीही संधी न देता रितू तावडे या मराठी उमेदवाराला संधी दिली आहे. रितू तावडे या गुजरातीबहुल घाटकोपरमधील आहेत. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाकडूनही उमेदवार दिले जाणार का? याची उत्सुकता आहे. या संदर्भात आज ठाकरे गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर निवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24 
मनसे – 6 
एमआयएम- 8 
एनसीपी – 3 
एसपी – 2 
एनसीपी शप – 1 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!