शेतकरी संघटनांसह कामगार संघटनांनी आज पुकारला ‘भारत बंद’; काय आहेत प्रमुख मागण्या?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारत-अमेरिका करारामधील तरतुदी या शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ पुकारला आहे. कामगार संघटनांनी सरकारचे धोरण कामगार विरोधी असल्याचा आरोप केला.

 

नवी दिल्ली- विविध कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी आज (12 फेब्रुवारी) भारत बंद पुकारला आहे. सरकारचे धोरण शेतकरी आणि कामगार विरोधी आहे, असा आरोप करत बंद पुकारला आहे. या संपात 30 कोटी कामगार आणि शेतकरी सहभागी होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित होईल, अशी शक्यता आहे.

भारत बंदमध्ये इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू), ऑल इंडिय ट्रेड यूनियन काँग्रेस (AITUC), इंडियन नॅशनल ट्रेड यूनियन काँग्रेस (INTUC), हिंद मजदूर सभा (HMS) या संघटना सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि इतर शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ला पाठिंबा दर्शविला आहे. भारत-अमेरिकेमधील अंतरिम करारामुळे आयात केलेल्या स्वस्त कृषी उत्पादनांमुळे भारतीय शेतीवर आणि शेतकऱ्यांवर परिणाम होईल, असा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. डाव्या पक्षांसह व्हीसीके आणि डीएमके या राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात बंदमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केलं. हा बंद केवळ आयात कराविरोधात नाही तर सरकारच्या धोरणाविरोधात आहेत, असा कामगार संघटनांचा दावा आहे.

कामगार संघटनांनी हे केलेत आरोप

(i) चार नवीन कामगार संहिता रद्द करणे. या संहिता कामगारांच्या हक्कांना कमकुवत करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

(ii) मसुदा बियाणे विधेयक आणि वीज दुरुस्ती विधेयक यासारखी विधेयके मागे घेणे.

(iii) मनरेगा आणि संबंधित सामाजिक सुरक्षा उपाययोजनांचे पुनरुज्जीवन करणे.

(iv) खासगीकरण आणि कॉर्पोरेट-अनुकूल सुधारणांना विरोध.

भारत बंदचा काय परिणाम होऊ शकतो?

  • 12 फेब्रुवारीच्या भारत बंदचा अनेक भागांमध्ये सामान्य जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • बस, ऑटो-रिक्षा आणि ट्रकसह सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते.
  • दुकाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक केंद्रे बंद राहू शकतात.
  • शाळा आणि महाविद्यालये बंद राहू शकतात.
  • सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांचे कामकाज स्थगित केले जाऊ शकते.
  • बँकांच्या बाबतीत, कर्मचारी संघटनांनी एक दिवसाचा संप जाहीर केला आहे. त्यामुळे, रोख व्यवहार आणि चेक क्लिअरिंगसारख्या प्रमुख सेवांना विलंब होऊ शकतो. असे असले तरी आरबीआयनं अधिकृत बँक सुट्टी जाहीर केलेली नाही.
  • रुग्णालये, रुग्णवाहिका आणि आवश्यक सुविधांसारख्या आपत्कालीन सेवा नेहमीप्रमाणं सुरळीत राहणार आहेत.
  • ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियासारख्या (बीईएफआय) संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. युनायटेड बँक फोरम युनियन, ओडिशा यांचे समन्वयक चित्तरंजन पांडा म्हणाले की, बँक कर्मचारी अप्रत्यक्षपणे निषेधात सहभागी होतील.
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

012816
error: Content is protected !!