श्रीकांत नाथे
नांदगाव खंडेश्वर : भातकुली येथील रहिवासी अजय खानंदे यांच्या डाव्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी तसेच नांदगाव खंडेश्वर येथील सविता अशोक लहानभर यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती यशोदा सदाशिव झिमटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले रक्तदान संघटनेच्या पदाधिकारी यांनी एक हात मदतीचा देत संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून रक्तदान आणि रुग्णसेवेची जाण ठेवली आणि सुमित खवले यांनी अल्पदरात औषधी उपलब्ध करून दिल्याने रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळाले.
यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख हॉस्पिटलचे डॉ.पुंडकर सर (एचओडी), डॉ.शुभम सर,डॉ.सुरज सर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले रक्तदान संघटनेचे अध्यक्ष योगेश घोडे,सचिव सागर दामेकर, अनिल हिवराळे, आकाश भाऊ यांचे विशेष सहकार्य लाभले.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 103