Nandgaon Murder Case: प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट…पत्नीची हत्या करून पतीनेही संपविले जीवन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रहाटगाव शेतशिवारातील घटना
सात महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

नांदगाव पेठ  : सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्नं रंगविणाऱ्या एका कुटुंबाचा आज दुर्दवी शेवट झाला.पत्नीची गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर स्वतः पतीनेसुद्धा आत्महत्या करून जीवन संपवील्याचा धक्कादायक प्रकार सकाळी ८ वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील प्रज्ज्वल पात्रे यांच्या शेतात घडला.  अमोल सुरेशराव गायकवाड (३५), व शिल्पा अमोल गायकवाड (३२) असे घटनेतील मृतकांचे नावे आहेत. घटनेमागील मूळ कारण अद्याप पुढे आले नाही. मात्र नांदगाव पेठ पोलीस  याबाबत सर्वच बाजूने तपास करीत आहे.

घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा व सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल सुरेशराव गायकवाड व रामगाव येथील शिल्पा अमोल गायकवाड यांचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. कल्पदीप मंगलकार्यालय मागे असलेल्या जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रज्वल विठ्ठलराव पात्रे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊस मध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी अमोलचे वडील बाहेरगावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलगा आणि सुनेला आवाज दिला मात्र त्यांना प्रत्युत्तर न मिळाल्याने अमोलच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले तर खोलीत पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला तर तर अमोलचा फासावर अडकलेला मृतदेह त्यांना दिसला.

त्यांनी लगेच ११२ वर फोन करून लगेच पोलिसांना पाचारण केले. शिवाय  नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांना माहिती मिळताच ते देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले.श्वान पथक व फॉरेन्सीक टीमला सुध्दा यावेळी पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त सागर पाटील, फ्रेजरपुरा विभागाचे एसीपी कैलास पुंडकर हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून शिल्पा व अमोल यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.  घटनेबाबत प्रमुख कारण अद्याप स्पष्ट नाही. अमोल ने शिल्पाची हत्या का केली असावी? स्वतः गळफास का घेतला? की अजून काही घातपात झाला याबाबत सर्वच बाजूने पोलीस तपास करीत आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कवडे तपास करीत आहे.

FacebookWhatsappInstagramTelegram
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!