
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) चिखलदरा:दिवसेंदिवस शेतीचा आकार लहान झाल्याने 75 टक्के शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत त्यामुळे शेती महत्त्वाची आहे त्यामुळे तंटे कमी होऊन यांत्रिक शेती शक्य होईल शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल म्हणून गट शेतीसाठी राज्यात लवकरच नवे धोरण आणले जाईल. तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान व त्यांचे सहकाऱ्यांनी पाण्यासाठी मोठी चळवळ उभी केली आहे आम्ही 2515 पासून जलयुक्त शिवार योजनेद्वारे ज्यांना आंदोलन उभे केले मात्र 2019 मध्ये ज्याला ब्रेक आला आता आपण यावर पुन्हा काम सुरू केले आहे मागील त्याला सौर पंपाचे धोरण अवलंबून सर्व फिडर सौर ऊर्जेवर कार्यान्वित करून डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास 20 देण्याचे उद्दिष्ट आहे नैसर्गिक शेतीसाठी पहिल्या टप्प्यात 25 लाख हेक्टर ची उद्दिष्ट ठेवले आहे विषमुक्त शेतीसाठी पाणी फाउंडेशनच्या मदतीने काम केले जाईल या कामासाठी एक लाख कर्मचाऱ्यांची फौज काम करेल ती पाच वर्षात बदललेल्या महाराष्ट्र दिसेल.अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे रविवारी तिसऱ्या पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२४ पुरस्काराचे वितरण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पाणी फाउंडेशन चे संस्थापक अभिनेते आमिर खान, किरण राव , मुख्य कार्यकारी अधिकारी,सत्यजित भटकळ हिवरे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार, सह्याद्री ऍग्रो चे विलास शिंदे, शांतीलाल जी मुथा, डॉ.अविनाश पोळ, सह अनेक सिने कलाकार दिग्गज मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन अभिनेते जितेंद्र जोशी व अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले.
सर्व गटाना मोफत ड्रोन
पाणी फाउंडेशनच्या चळवळीत राजकारण नाही त्यामुळे गटतट विसरून सगळे एकत्र काम करतात हल्ली नातेसंबंध नीर राहत नाहीत अशावेळी फाउंडेशन कडून गट शेती संकल्पना राबविली जात आहे रासायनिक फवारणी न करणाऱ्या कृषी विभाग अंतर्गत गट शेतीसाठी मोफत ड्रोन दिले जाईल चांगल्या शरीरासाठी निरोगी शेती होणे गरजेचे आहे.
माणिकराव कोकाटे कृषिमंत्री
यंदापासून पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी स्पर्धा घेणार
ज्यांच्याकडे लहान शेती आहे त्यांची उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने तीन वर्षापासून गटशेती उपक्रम हाती घेतला आहे हा उपक्रम शासनाच्या सहकार्याने यशस्वी झाला आहे खरे तर हे यश शेतकऱ्यामुळे मिळाले यापुढे गटशेतीचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाणार आहे ही स्पर्धा यंदापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी घेतली जाणार आहे.
आमिर खान अभिनेते व पाणी फाउंडेशन प्रमुख
मातीचे आरोग्य जपणे गरजेचे गटशेती चळवळीत शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे महिला शेतकरी वाढत आहे तरीही पर्यावरणातील बदलामुळे आणि वाढत्या तापमानामुळे शेती संकटात आहे त्यामुळे आपण मातीचे आरोग्य जपणे गरजेचे आहे म्हणून सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे पर्यावरण बदलामुळे शेती पुढे आव्हाने असली तरी इतर व्यवसायांशी निगडित शेती केली तर त्यावर काही प्रमाणात मात करता येते.
किरण राव
पाणी फाउंडेशन चे पुरस्कार विजेते प्रथम क्रमांक भाग्योदय शेतकरी गट ,तेरती, ता. तासगाव जि. सांगली द्वितीय क्रमांक संयुक्त सर सेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट, भोसरे ता. खटाव जि. सातारा व उंच भरारी महिला शेतकरी गट, सोबलगाव ता. खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर तृतीय क्रमांक संयुक्त जय बिरसा मुंडा शेतकरी गट, कवडा ता. कळमनुरी जि.हिंगोली व माऊली शेतकरी गट, नागी ता. मंगरूळपीर जि. वाशिम राज्यस्तरीय महिला शेतकरी गट पुरस्कार अन्नदाता महिला शेतकरी गट, चिंचोली (नकीब) ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर जय मल्हार महिला शेतकरी गट महाल किन्हेळा ता. फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर जिजाऊ महिला कापूस उत्पादक गट,खरसोली ता. नरखेड जि. नागपूर चिखलदरा तालुका प्रथम क्रमांक श्री चक्रधर शेतकरी गट, दहेंद्री द्वितीय क्रमांक अभिनंदन महिला शेतकरी गट, बामादेही व संस्कृती महिला शेतकरी गट, काजलडोह
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





