करणीचा आळ; राजना पुर्णा येथे दंगा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

५४ वर्षीय गृहस्थाला बेदम मारहाण; आसेगाव पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हे

 

 

अमरावती : माझ्या मोठ्या आईला तू करणी केल्यामुळे ती मरण पावली, असा आळ घेऊन एका ५४ वर्षीय व्यक्तीस सात जणांनी बेदम मारहाण केली. ३० मार्च रोजी रात्री ११ ते ११:१५ च्या सुमारास राजना पूर्णा येथे ती घटना घडली. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी सोमवारी सात आरोपींविरुद्ध दंग्याचा गुन्हा नोंदविला. यात श्रीकृष्ण रामराव पारिसे (५४, राजनापूर्णा, ता. चांदूर बाजार) हे गंभीर जखमी झाले.

 

याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी कृष्णा नांदणे (४०, सावळापूर), रामेश्वर गुलाब पारिसे (५५), प्रथमेश पारिसे, गोवर्धन पारिसे, विपीन पारिसे, सुधीर पारिसे, प्रदीप पारिसे (३४, सर्व रा. राजना पूर्णा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ अशोक थोरात ठाणेदार संजय राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. १६ मार्च रोजी रामेश्वर पारिसे यांच्या पत्नी दुचाकीहून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, ३० मार्च रोजी त्या दगावल्या.

असा झाला दंगा श्रीकृष्ण पारिसे हे मृत महिलेला पाहण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यावेळी प्रथमेश पारिसे याने श्रीकृष्ण पारिसे यांच्याशी वाद घातला. तू माझ्या मोठ्या आईला करणी केली म्हणून ती मरण पावली, असा आरोप करण्यात आला. त्या संशयावरून सातही आरोपींनी श्रीकृष्ण पारिसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पोटावर, पाठीवर व डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. मात्र, पारिसे कुटुंबात त्यादिवशी शोकविव्हळ वातावरण असल्याने श्रीकृष्ण पारिसे यांनी त्या दिवशी तक्रार दाखल केली नाही.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!