रिसोड : वाशिम जिल्ह्यातील कांरजा मानोरा मंगरुळपीर तालुक्याची ची आढावा बैठक गुरुवार दि १७ तारखेला आयोजीत केली आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी या आढावा बैठकीसाठी उपस्थित रहावे या बैठकी मध्ये शेतकर्यांची कर्जमाफी, रखडलेला पिक विमा,शेतकऱ्यांची विजजोडणी या संदर्भात आढावा बैठकीमध्ये विषय घेतले जाणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू असे खोटे आश्वासन दिले होते. परंतु कर्जमाफी झाली नाही.
शतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासना मुळे व नापिकीमुळे शेतकऱ्यांना कर्ज भरता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही. पीक कर्ज न मिळाल्यास शेतकरी खरीप तील पेरणी करू शकणार नाही. शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कर्जमाफी साठी आदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल. तसेच नविन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या बैठकीसाठी भुमिपुत्र चे संस्थापक तथा रिसोड कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. विष्णूपंत भुतेकर हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
तथा भूमिपुत्रचे जिल्हाध्यक्ष श्री रामेश्वर अवचार, राज्य महिला समन्वयक डॉ. तृप्तीताई गवळी, काळजी वाहू जिल्हाध्यक्ष मा. सतोष सुर्वे, जिल्हा प्रवकते देव इंगोले, महिला जिल्हा अध्यक्षा सौ. संगीताताई मार्गे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मा. बालाजी बोरकर, कांरजा तालुका अध्यक्ष श्री देवेंद्र लांडकर, मानोरा अध्यक्ष भूषन मुराळे, मंगरूळचे अध्यक्ष विलासराव गहूले, युवा अध्यक्ष सतीष मालवे, महिला ता अध्यक्ष वंदनाताई कांबळे, प्रवक्ते पंकज इंगळे, तुषार गांवडे, अभिजित जाधव, रवि लाहे या आढावा बैठकी साठी उपस्थित राहणार आहेत. तरी कारंजा, मानोरा, मंगरूळ नाथ तालुक्यातील भूमिपुत्रच्या सर्व पदाधिकार्यानी व शेतकऱ्यानी सकाळी ११. 30 ला शासकीय विश्राम गृह कांरजा येथे उपस्थित रहावे असे आव्हान भुमिपुत्रा चे कांरजा तालुका अध्यक्ष देवेद्र पाटील लांडकर यांनी केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





