RTO Department Action: आरटीओ विभागाची निवडक वाहनांवर कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदगाव पेठ : मंगळवारी डोळ्यात राख उडाल्याने घडलेल्या अपघातात ऋषीकेश निंभोरकर नामक तरुण जागीच ठार झाला. घटनेमुळे कुटुंबीयांनी तसेच प्रहार कार्यकर्त्यांनी आक्रोश करत राखेच्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्याचे लेखी पत्र सुद्धा दिले. मात्र बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात विभागाने केवळ ११ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून सव्वा दोन लाखांचा दंड आकरला. विशेष म्हणजे ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी करण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.

११ वाहनांकडून सव्वा दोन लाखांचा दंड वसूल

दररोज शेकडो ओव्हरलोड वाहने राख भरून निघत आहे. शिवाय राखेची रिकामी वाहने भरधाव महामार्गावरून धावत असल्याने राख उडून सामान्य नागरिक, प्रवासी आणि चालकाच्या डोळ्यात शिरत आहे आणि यामुळेच अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अश्याच घटनेत ऋषिकेश निंभोरकर याचा मंगळवारी अपघात झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऋषिकेशच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा वेगळेच वळण मिळाले. ट्रक मालकांकडून आठ ते दहा लाख रुपये महिना कमविणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागाला  सामान्य नागरिकांच्या मृत्यूचे कसले देणेघेणे. मात्र ऋषिकेशच्या अपघाती मृत्यूनंतर प्रादेशिक परिवहन विभागाने मोठा वाद निर्माण होऊ नये म्हणून लेखी पत्र तर दिले. परंतु कारवाई कशी करावी, अश्या संभ्रमात असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने दोन दिवसात मन मारून केवळ ११ वाहनांवर कारवाई केली.

दोन दिवसांच्या मोहिमेत आढळले केवळ ११ वाहन

सव्वा दोन लाखांचा दंड वाहन मालकांकडून आकारण्यात आला. मात्र दंड भरून पुन्हा तीच वाहने ओव्हरलोड वाहतुकीसाठी सज्ज झाली. राखेचे ओव्हरलोड वाहतूक ही नित्याचीच बाब मात्र ज्या उडणाऱ्या राखेवर प्रतिबंध करायला पाहिजे ते करतांना प्रादेशिक विभाग मात्र अनास्था दाखवत आहे. गेल्या दोन दिवसापासून विशेष तपासणी मोहीम अंतर्गत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये राखेची वाहतूक करणारे अकरा वाहनावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये  कार्यवाही करण्यात येऊन त्यांच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात आला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक निलेश दहेकर , पल्लवी दौंड , सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश गावंडे , शिवशंकर कातडे, कांचन जाधव, निलेश जाधव, वाहन चालक मोहम्मद अतहर , बलराज बोंडवले , अमित पाल व पंकज कोवे यांनी ही कार्यवाही केली.

सात महिन्यात केवळ ५४ वाहनांवर कारवाई

ऑक्टोबर महिन्यात उडणाऱ्या राखेचे प्रकरण माध्यमांनी मांडले होते त्यानंतर त्या महिन्यात आणि त्यांनतर थेट या दोन दिवसात एकंदरीत सात महिन्यात केवळ ५४ वाहनांवर कार्यवाही करण्यात येऊन त्यांच्याकडून १९ लाख ९० हजार पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013544
error: Content is protected !!