Parbhani crime : परभणीच्या गौंडगाव व अंधापुरी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परभणी  :- पाथरी तालुक्यातील गौंडगाव व अंधापुरी परिसरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या प्रकरणांत एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवायांमध्ये सुमारे ३५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

३५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

पोलिसांच्या वाळू माफिया सध्या रडावर असून बुधवार २३ एप्रिल रोजी रात्री पोलिसांनी केलेल्या धडक कारवाई मध्ये अवैध वाळू  उपसा व वाहतूक करणाऱ्या माफीयांचे कंबरडे मोडले आहे .

पहिली कारवाई ..

गौंडगाव येथील रेणुका माता मंदिराजवळ बुधवार २३ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता पोलिसांनी छापा टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेला भारत बेज कंपनीचा हायवा एमएच ४४ – टी ८०९१ .जप्त केला. या प्रकरणात आरोपी गोरख भीमा गव्हाणे (रा. हरिश्चंद्र पिंपरी, बीड) व गणेश हिरामण कांबळे (रा. वडवणी) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. वाहनाची किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसरी कारवाई …

अंधापुरी येथे बुधवारी पहाटे ४. ३० वाजता दुसरी कारवाई करण्यात आली. आरोपी अभिषेक सुरेश गिराम (वय २२) व केतन सर्जेराव गिराम (दोघे रा. बाभळगाव, पाथरी) यांनी संगणमत करून ट्रॅक्टर एमएच २२ एडी ०४१८ द्वारे एक ब्रास वाळू वाहून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टरसह एक ब्रास वाळू जप्त करून ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

तिसरी कारवाई ..

याच दिवशी मध्यरात्री १२.३० वाजता अंधापुरी येथेच आणखी एका ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. अशोक शिवाजी महाडिक (वय 28, रा. अंधापुरी) याने ट्रॅक्टर एमएच २१ ७७९३ च्या सहाय्याने वाळू वाहतूक करताना पकडला गेला. ५ लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त झाला असून, आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तिन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही कारवायांमध्ये पोनि महेश लांडगे, सपोनि कापुरे, सपोउपनि सोनवणे, पोना कदम, पो.शि. राऊत, कोल्हे, शिंदे यांचा सहभाग होता. पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013541
error: Content is protected !!