अंजनगाव सुर्जी पंचायत समिती कार्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न; २० रक्तदात्यांनी केले रक्तदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) : अंजनगाव सुर्जी येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तसेच जागतिक रक्तदान दिन सप्ताहाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण २० दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्रीकृष्ण खताळे, तालुका वैद्यकीय अधिकारी फरहान खान, गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्या
हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिराकरता जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढीचे रक्त संकलन अधिकारी डॉ. राहुल खराटे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, परिचारिका संगीता गायधनी, मंगेश उमप, प्रवीण कळस्कर या चमूने शिबिराला उपस्थित राहून रक्तसंकलन केले. या शिबिरात पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!