-सचिन इंगळे (प्रतिनिधी) धारणी:तालुक्यातील शेतकरी व नागरिकांवर उद्भवलेल्या विविध समस्या लक्षात घेता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने आज धारणी येथील तहसील कार्यालयात जोरदार आंदोलने करत निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले. मेळघाटातील शेतकऱ्यांनी चंदा केलेल्या खरड नोंदीसंदर्भातील पैसे अद्याप शेतकन्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. केवायसी पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर विरोधाच्या पार्श्वभूमीवर, धारणीसारख्या आदिवासी व मागास भागात चारपट अधिक बील करणाऱ्या या मीटरची जबरदस्तीने बसवणूक थांबवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
शेतीच्या हंगामात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ही गंभीर समस्या ठरत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.
शेतकन्यांची कर्जमाफी पूर्णतः लागू करून त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
सहाः स्थितीत शेतकरी खते न मिळाल्यामुळे चिंतेत आहेत. डीएपी आणि पुरिया खते तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत, असा आग्रह धरण्यात आला.
या निवेदना दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) धारणी तालुक्याचे प्रमुख राजू राठोड, उपजिल्हा प्रमुख शैलेंद्र उर्फ राजू मालवीय, सुनील चैधमल, दीनू धनेवार, श्रीराम मालवीय, अफजल, दयाराम सोनी तसेच शेकडो शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनावर तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी योग्य त्या पातळीवर मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
मेळघाटातील शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यापुढे जर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने दिला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





