रत्नागिरी : फेसबुक लाईव्हवर आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने फेसबुक या सोशल मीडियावर टाकला. इतकंच नाही तर आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओही त्याने मोबाईल वरून प्रसारित केला होता.
त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र सावध असलेल्या रत्नागिरी सायबर विभागाच्या हा मेसेज व व्हिडिओ हा सगळा धक्कादायक प्रकार लक्षात येताच तात्काळ सूत्र हलली. याची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. घरी आई-वडिलांजवळ वाद झाला याच कारणातून त्यांना घाबरवण्यासाठी अशा स्वरूपाचा मेसेज फेसबुक पेजवर टाकून व्हिडिओ मोबाईलवर वायरल करून हा युवक आत्महत्या करण्याचे विचारत होता. मात्र रत्नागिरी सायबर कक्ष व दापोली पोलिसांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची ठरली आहे.
दापोली ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी दापोली पोलिसांचे पथक पोहोचले आणि एका युवकाचा जीव दापोली वाचवण्यात मोठे यश आलं आहे. दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर व पथकाने तात्काळ शोध घेऊन युवकाला ताब्यात घेत त्याला धीर देण्याचे काम केले व त्याला समजावूनही सांगितले त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे. उत्तर प्रदेशातील असलेला व दापोली शहरातील काळ काही कोण परिसरात भाड्याच्या जागेत राहणारा जंग बहादूर रणविर सिंग या युवकाचा जीव पोलिसांनी वाचवला आहे.
केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





