अमरावती : शेतकऱ्याने उभारलेल्या सौर पंपाचे वादळी वाऱ्याने झाले नुकसान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : तालुक्यातील भुरस रामागड येथील येथील शेतकऱ्याने पोटाला चिमटा घेऊन आपल्या शेतात सौर ऊर्जा पंप उभारले. मात्र, नैसर्गिक आपत्ती कधी काय घटना घडवून आणेल, हे काही सांगता येन शक्य नाही.

अशीच एक घटना दर्यापूर तालुक्यात समोर आली आहे. भुरस रामागड येथील शेतकरी यांचे शेत शेतशिवारात असून वादळी वाऱ्यामुळे गट क्र. ४२ मधील रमा बोद्राजी प्रभे या शेतकरी महिलेच्या शेतातील शेत विहीरीजवळ सौर कृषी पंपाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे.

पावसाळा सुरु झाला असून, कपाशी लागवड जोमात सुरू असताना मध्येच ही अडचण निर्माण झाल्याने सध्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. शेतकरी महिला रमा प्रभे यांच्या शेतात शेत विहीरी जवळ कसुम सोलर पंप योजने अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यात आला आहे. भुरस रामागड परिसरात दि. २४ जून २०२५ ला दुपारी २ वाजेच्या सुमारे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील सौर पंपावरील पॅनल पूर्णतः उडून गेले आहेत. यामुळे शेतकरी महिला रमा प्रभे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या कारणास्तव सदर शेतकरी सध्या प्रचंड चिंतेत असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013515
error: Content is protected !!