ट्रॅक्टर अचानक उलटून भीषण अपघात; एका युवकाचा मृत्यू, पाच जण जखमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

या अपघातात अनिकेत सुनील मुंदाफळे याचा जागीच मृत्यू झाला. इतर गंभीर जखमींना आष्टगावचे सरपंच दर्शन माल्हा व बंडू साउथ यांच्या वाहनातून मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

 

अमरावती : वीज वितरणासाठी वापरण्यात येणारे सिमेंटचे खांब घेऊन जात असलेला ट्रॅक्टर अचानक उलटून झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात आज १४ जुलै रोजी दुपारी मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरला फाट्यानजीक घडली. अनिकेत सुनील मुंदाफळे (वय २६) रा. आष्टगाव असे मृताचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर असलेल्या आष्टगाव गाव येथून मजूर सचिन धनू लोखंडे (वय २९ वर्षे), रोशन शामराव धारवाडे (वय २७ वर्षे), रोशन लंगडाजी कासदेकर(वय २२ वर्षे), दीपक गणेश भोकरे (वय २३ वर्षे) सर्व रा.बैलमंडी तसेच अनिल महेश जानवंशी (वय ३२ वर्षे) व अनिकेत सुनील मुंदाफळे (वय २६ वर्षे) दोघेही रा.आष्टगाव हे आष्टगाव येथून महिंद्रा ट्रॅक्टर क्र.एम.एच.२७/ डी.एल. ०४७२ यामध्ये सिमेंटचे इलेक्ट्रिक खांब लावण्यासाठी बेलोरा येथे जात असतांना अचानक वरला ते आष्टगावच्या मध्यभागी ट्रॅक्टर उलटला.

या अपघातात अनिकेत सुनील मुंदाफळे याचा जागीच मृत्यू झाला. इतर गंभीर जखमींना आष्टगावचे सरपंच दर्शन माल्हा व बंडू साउथ यांच्या वाहनातून मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून जखमींपैकी सचिन धनू लोखंडे, रोशन शामराव धारवाडे, रोशन लंगडाजी कासदेकर, अनिल महेश जानवंशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.

 

 

दीपक गणेश भोकरे यांना किरकोळ मार असल्याने त्यांचा उपचार उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू आहे.या झालेल्या भीषण अपघातात जखमींना तानाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पंडागरे, रवी परतेती, स्वप्निल फुके व आष्टगाव येथील ग्रामवासी यांची मदत मिळाली. मोर्शीचे ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार, सचिन भाकरे व पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. पंचनामा आटोपला असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधून इलेक्ट्रिकचे खांब वाहून नेण्यात येत होते. त्याचे वजन जास्त असते. या वजनामुळेच वाहनचालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013515
error: Content is protected !!