कुठे चालले अमरावती शहर, पाच जणांविरुद्ध गुन्हा, शंकरनगरातील रेस्टो बारमधील चिंचोळ्या हॉलमध्ये कर्णकर्कश संगीतावर घातला जात होता धिंगाणा, अल्पवयीन मुलामुलींच्या हाती पेग
अमरावती : शंकरनगरस्थित एका रेस्टारंट बारमध्ये अल्पवयीन मुलामुलींना दारू सर्व्ह केली जात असल्याची माहिती वजा व्हिडीओ गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाला, पथक लागलीच तेथे पोहोचले. मात्र समोरील बिभत्स दृश्य पाहून तेही काही क्षणांसाठी अवाक राहिले. ती टिप पोलिसांना बार व्यावसायिकांच्या स्पर्धेतून मिळाली होती, हे विशेष.
त्या बारमधील तिसऱ्या माळ्यावरील चिंचोळ्या हॉलमध्ये मुंगीला शिरायला जागा नव्हती. तेथे हाती पेग घेऊन केवळ अन् केवळ तरूणाईचा उभा धिंगाणा सुरू होता. आत गेल्यावर काही वेळाने आपण अमरावती शहरातील पहिल्याच फेक वेडिंगवर धाड टाकल्याची जाणीव पोलिसांना झाली. त्यांनी राजापेठसह अतिरिक्त कुमकदेखील बोलावून घेतली. सध्या तरुण पिढीमध्ये नवा ‘फेक वेडिंग पार्टी’चा ट्रेंड बघायला मिळतो आहे. यात नवरदेव आणि नवरी वगळता सर्व काही विवाह सोहळ्यासारखे असते. येथील शंकरनगरस्थित एरिया ९१ रेस्ट्रो – बारमध्येदेखील रविवारी रात्री अशाच एका द फेक वेडिंग’चे आयोजन केले गेले. ते पूर्ण जोशात आले असतानाच पोलिसांनी ते उधळले. तेथे अल्पवयीन मुला-मुलींना दारू सर्व्ह केली जात होती.
‘फेक वेडिंग पार्टी’ हा नवा प्रकार अमरावतीत पाहायला मिळतो आहे. यात सजावट, बैंड-बाजा आणि तरात खन्ऱ्या लग्नाप्रमाणे असतात. पार्टीत सहभागी तरूणाई शेरवानी, लेहंगा यासारख्या पेहरावात येतात. नवरदेव-नवरी वगळता यात सर्व काही विवाह सोहळ्यासारखे असते. अगदी तशीच ‘द फेक वेडिंग’ आयोजक सॅम बजाजने येथील एरिया ९१ या बारमध्ये रविवारी आयोजित केली होती. तेथे १५० ते १७५ तरुण-तरुणी झिंगलेल्या स्थितीत व काहीजण अश्लील वर्तन, नत्य करताना आढळले.
मुलींना फ्री एन्ट्री, मुलांकडून ५०० रुपये
आयोजक सॅम बजाज व अन्य चौधांनी या ‘द फेक वेडिंग’मध्ये सहभागी होणाऱ्या मुलांसाठी ५०० रुपये एन्ट्री फी ठेवली होती. तर अल्पवयीन मुली तथा १८ वर्षांवरील तरुणींना मोफत प्रवेश होता. डान्स करण्यासाठी व रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी अनेक मुली तेथे सहभागी झाल्या होत्या. मुलांनीच पार्टनर मुलींचा दारूचा खर्च केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
पालकांनो, लक्ष द्याच तेथे अनेक अल्पवयीन मुली तथा अन्य काही तरूणी तोकड्या कपड्यात दिसून आल्या. सबब, आपल्या मुलीचा पेहराव कसा, ती रात्री नेमकी कुठे चालली आहे, याकडे पालकांनी अधिक सजगपणे लक्ष देण्याची गरज या घटनेतून उघड झाली आहे. आपल्या मुली पाठीवरील बॅगमध्ये नेमक्या कुठल्या वस्तू घेऊन जात आहे, ते आईने, पालकांनी पाहणे गरजेचे आहे.
थापा मारून पार्टीत झिंगलेल्या स्थितीत नृत्य करणाऱ्यांमध्ये शंभराच्या आसपास मुली, तरुणी होत्या. त्यातील ५० ते ६० मुली व ४० मुले हे अल्पवयीन होते. त्या सर्व मुला-मुलींच्या पालकांना बोलावण्यात आले. त्यांनी आपल्या झिंगलेल्या पाल्यांची विदारक अवस्था अनुभवली, मैत्रिणीकडे जाते, अभ्यासाला जात आहे, वाढदिवस आहे, रिसेप्शन आहे, अशा नानाविध थापा मारून काही मुले-मुली ‘द फेक वेडिंग’मध्ये पोहोचल्या होत्या. आपली टिनएजर्स मुले मद्याच्या अमलाखाली पाहून अनेकांचा संताप अनावर झाला. मैत्रिणीच्या पार्टीसाठी जात आहोत, असे म्हटल्याने आपणच मुलीला तेथे सोडले होते, असे एक पालक संतापून म्हणा
मुली झिंगलेल्या स्थितीत पायऱ्यांवर
रेस्ट्रो बारमध्ये तिसऱ्या मजल्यावरील एका छोट्या हॉलमध्ये विदेशी महा सर्व्ह केले जात होते. हॉलमध्ये सुमारे १५० ते १७५ तरुणाईचा धिंगाणा सुरू होता. यावेळी अनेकांच्या हातात दारूचे ग्लास होते. मुलींची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात होती. अनेक मुले, मुली तर इतके झिंगले होते, की त्यांना नीट उभे राहता येत नव्हते. काहीतर अति झिंगल्यामुळे बारच्या पायऱ्यांवर झोपले होते. काही मुली अत्यंत तोकड्या कपड्यात होत्या. त्यांना नाव सांगण्याइतपतही शुद्ध नव्हती. पालकांना बोलावून त्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. काही मुली पालकांच्या खांद्यावर डोके ठेऊन होत्या. मात्र त्यांची झिंग उतरलेली नव्हती.
मुलींचे हाल पाहून महिला अंमलदारही चक्रावल्या
अनेक मुले-मुलींना स्वतःची नावेदेखील सांगता येत नव्हती. तर काही मुलींचे तोकडे कपडे पाहून महिला अंमलदारही चक्रावल्या होत्या. काही तरुणी या फेक वेडिंग इव्हेंटसाठी नटून सवरूनदेखील आल्याचे पोलिसांनी सांगितले. काही तरुणी या अत्यंत तोकड्या कपड्यात दिसून आल्याने त्या त्याच कपड्यात, पेहरावात घराबाहेर निघाल्या असतील का, नक्कीच नाही, इकडे येऊन त्यांनी स्वतःला मॉड लूक केला असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





