नव्याने १२५६ शिधापत्रिका धारकांना लाभ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदगाव खंडेश्वर : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यासाठी प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत तालुक्यात आता नव्याने १२५६ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यात ४ हजार ७८४ लाभार्थी आहेत. मे महिन्यापासून नव्याने हे लाभार्थी प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. यात भूमिहीन, अल्पभूधारक, शेतमजूर, विधवा व ज्यांना धान्य मिळत नव्हते, अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी या तालुक्यात १६ हजार ९४२ शिधापत्रिकाधारक व त्यात ६८ हजार ४२५ लाभार्थी होते. तालुक्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत समाविष्ट झालेल्या शिधापत्रिकेनुसार आता सुमारे १८ हजार १९८ शिधापत्रिकाधारक असून, ७३ हजार २०९ लाभार्थी आहेत. यापुढे प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध होणार आहे, असे तहसीलदार अश्विनी जाधव व पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी शीतल राठोड यांनी सांगितले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013515
error: Content is protected !!