अचलपूर तालुक्यात हिरवी वांगी उत्पादक मालामाल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पथ्रोट : अचलपूर तालुक्यात उत्पादित होणारी हिरवी वांगी उत्पादकांना मालामाल करीत आहे. दररोज कित्येक टन वांगी परराज्यातही जात आहेत.

तालुक्यात सिंचनाची बऱ्यापैकी सुविधा असल्यामुळे संत्रा, केळी, पपई, सीताफळासह भाजीपाल्यामध्ये हिरवी वांगी उत्पादकांना मालामाल करीत आहे. शेती करणे परवडत नसल्याची सतत ओरड होत असताना अचलपूर तालुक्यातील काही गावांमध्ये सलग सहा महिने केवळ वांग्याच्या उत्पादनातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. एक एकर शेती असणारा शेतकरी केवळ वांगी विकून दिवसाला तीन ते चार हजार रुपये कमावत असल्याचे चित्र आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यात दररोज १०० टनावर वांगी जातात.

पथ्रोट, परसापूर, हरम आदी गावे पूर्वी मिरची, भुईमूग आणि कापसासाठी प्रसिद्ध होती. येथे पिकणारी मिरची आणि कापूस या दोन्ही पिकांना या भागातून चांगली मागणी होती. तथापि, गेल्या दोन दशकात पथ्रोट येथील जांभळ्या वांग्यांसह हिरवी वांगी अतिशय चवदार आणि दर्जेदार होत असल्याने त्याला मागणी वाढली आहे.

 

महाशिवरात्रीपासून प्रारंभ महाशिवरात्रीला बी रोपवाटिकेत लावून रोपे तयार केली जातात. आता दर आठवड्यात वांग्याची तोडणी सुरू झाली आहे. उत्पादकाच्या माहितीनुसार, एक एकर शेतात एकूण एकरी १० हजार रुपयांच्यावर वांगी प्रत्येक आठवड्याला तोडली जातात. या तोडणीचा मात्र कुठलाही हिशेब नसतो. कधी एकरी दोन लाख रुपयांचा माल निघतो, कधी पाच, सात, कथी दहा लाखांचा माल येतो.

 

वांग्याची थेट शेतातूनच विक्री होते. दुसऱ्या दिवशी विकलेल्या मालाचे पैसे मिळतात. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार अवघ्या सहा महिन्यात होतो.

राजेश नळकांडे, शेतकरी

 

अमरावती जिल्ह्यात जांभळ्या रंगाची वांगी सर्वाधिक खाल्ली जातात. मात्र, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा या भागात हिरवी वांगी मोठ्या चवीने खातात. कर्नाटक, ओडिशा आणि आंध्रप्रदेशात दररोज आमच्या गावातून ट्रक भरून वांगी जातात.

पवन नरेटे, व्यापारी

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013514
error: Content is protected !!