नवी मुंबई: सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टैंड व सेक्टर ३० येथील बस स्थानकामधील रस्त्यांची अवस्था गंभीर झाली आहे. तसेच वेवील पदपथांची दुरवस्था झाल्याने त्यांची तत्काळ सुधारणा व दुरुस्ती करावी, असे निवेदन मनसेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता आर. एन. दिवेकर यांची भेट घेऊन दिले आहे. या वेळी त्यांच्या सोबत मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. शशिकांत गायकवाड हे देखील सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टैंड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्त्यांची व पदपथांची पावसामुळे दुर्दशा झाली आहे. येथे पावसामुळे मोठे खड्डे तवार झाले असून, रस्त्यांची चाळण झाली आहे. येथील रस्त्यावरील खड्धात पावसाचे पाणी साचत असल्याने त्यातून वाट काढणे वाहन चालकांसोचतच पादचाऱ्यांना त्यातून वाट काढणे अवघड होत असल्याचे त्यांनी सिडकोला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
एक महिन्यापूर्वी सिडकोकडून रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टैंडमधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आठवड्याभरातच येचे पुन्हा खड़े पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी संताप व्यक्त करत देवील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून वाहनचालकांसोबतच नागरिकांना व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता आर. एन. दिवेकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





