जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सुनील फुंडे यांची अध्यक्षपदाची हॅट्रीक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अध्यक्षपदी सुनील फुंडे तर उपाध्यक्षपदी प्रदीप पडोळे यांची बिनविरोध निवड

भंडारा : सहकार क्षेत्रातील शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असणार्‍या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता दि. १३ ऑगस्ट रोजी बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची सभा बोलविण्यात आली. या सभेत सुनील फुंडे यांची सलग तिसर्‍यांदा व उपाध्यक्षपदी इंजि. प्रदीप पडोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहकार पॅनलचे १७ तर शेतकरी पॅनलचे ४ संचालक निर्वाचित झाले होते.

शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार्‍या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दि. १८ जुलै २०२५ रोजी २१ संचालक पदांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी नेते खा. प्रफुल्लभाई पटेल, माजी राज्यमंत्री आ. डॉ.परिणय फुके व मित्र पक्षाकडून महायुती समर्थित सहकार पॅनल व आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसप्रणीत शेतकरी पॅनल आमोरसामोर उभ्या ठाकल्या होत्या. झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलला १७ जागा तर शेतकरी पॅनलला ४ जागांवर विजय प्राप्त झाला.

 

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर  सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता राजकीय नेत्यांसह पदाधिकारी व नागरिकांना लागली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता सहकार पॅनलमध्ये हलचली वाढून मोर्चेबांधणी करण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013510
error: Content is protected !!