“राजीव कुमार कुठे आहेत?”; संजय राऊत म्हणाले, “2029 च्या निवडणुकीत कोकणात कोणाचं दुकानं बंद होतं ते समजेल”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

देवेंद्र फडणवीस तुमच्या आजूबाजूला चोर, लफंगे आणि दरोडेखोर आहेत. त्यांना पाठीशी घालू नका, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

 

मुंबई : 90 हजार कोटींची तुम्ही लूट केली. सध्याचे नगरविकास मंत्री किंवा जे मुख्यमंत्री होते, त्यांनी 2 लाख कोटींची कामे दिली, पण तिजोरीत पैसे नाहीत. कोणाला कोणती कामं दिली, याचा पत्ता नाही मात्र त्या 2 लाख कोटींचं कमिशन त्यांच्याकडे पोहोचलं. यामध्ये फडणवीसांची लोकसुद्धा आहेत. महानगरपालिका कोणी लुटली? हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे आणि लूटमार करणाऱ्यांच्या हंड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरत आहात. ज्यांनी मुंबई लुटली त्यांच्याच हंड्या तुम्ही फोडताय. ज्यांनी दही लोणी ओरपून खाल्लं आहे, त्यांच्या हंड्या तुम्ही फोडताय. याला काय म्हणायचं. देवेंद्र फडणवीस तुमच्या आजूबाजूला चोर, लफंगे आणि दरोडेखोर आहेत. त्यांना पाठीशी घालू नका, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केलीय. संजय राऊत आज मुंबईत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस राजकारणातले जोकर : ते पुढे म्हणाले की, हे गौतम अदानींची हंडी फोडणारे लोक, गौतम अदानीच्या हंडीतलं लोणी खाणारे हे लोक. धारावीसारखे मुंबईतले अनेक भूखंड ज्यांनी अदानीच्या घश्यात घातले ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका आणि आरोप करीत आहेत, हाच सगळ्यात मोठा जोक आहे. प्रेसिडेंट ट्रम्पनंतर जर राजकारणातले जोकर कोणी झाले असतील ते देवेंद्र फडणवीस आहेत. काल मी निवडणूक आयुक्तांवर एक ट्विट केले आहे की, 2024 च्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयुक्त म्हणून राजीवकुमार यांनी काम पाहिलं. त्यांच्या सहकार्याने नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणूक जिंकू शकले. ते माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोपांचे हल्ले सुरू केल्यापासून राजीव कुमार गायब आहेत. खरं तर राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरं तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देणं अपेक्षित आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत? : ज्यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह घटनेविरुद्ध जाऊन शिंदे गटाच्या गद्दारांना दिलं. त्यासाठी किती कोटींचा व्यवहार झाला ते मी याआधीच सांगितलं आहे. ते राजीव कुमार आता या क्षणी कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. तो प्रश्न मी सोशल मीडियावर टाकल्यापासून दिल्लीमध्येदेखील यावर चर्चा सुरू झाली आहे. जसे जगदीप धनखड दिसत नव्हते, तसे सर्व राजकीय विरोधक जेव्हापासून निवडणूक आयोगाला प्रश्न विचारात आहेत, तेव्हापासून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार दिसत नाहीत. सरकारने त्यांना मत व्यक्त करण्यापासून थांबवल्याचं दिसत आहे. कदाचित त्यांना दिल्लीमध्ये ठेवलं नाही, अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली.

राणे भाजपाच्या मेहरबानीवर जगत आहेत : नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे आणि बाकी सगळे दहीहंडी वीर आहेत. नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत तीनवेळा बंद झालं. ते शिवसेनेत होते, तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं गेलं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचं दुकान बंद पडलं आणि आता भाजपामध्ये ते मेहरबानीवर जगत आहेत. जसं एखाद्याला वृद्धाश्रमात टाकून जगवलं जातं. तसं ते कृत्रिम श्वासावर जगत आहेत. त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029 च्या निवडणुकीत कोकणात कोणाचं दुकान बंद होतं ते आपल्याला कळेलच. शिवसेनेत असताना त्यांना ती भाषा शोभायची, पण नारायण राणेंनी ते करू नये. आपल्या वयाचं भान ठेवून बोलावं, अशी टीका राऊत यांनी नारायण राणेंवर केलीय. ईडी आणि पोलिसांना न घाबरता संजय राऊत कसे ताठपणे उभे आहेत हे सर्वांना माहीत आहे. तुमच्यासारखे घाबरट आणि गद्दार आम्ही नाही आहोत. त्यामुळे आम्हाला जो झटका आहे, तो स्वाभिमानाचा झटका आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013510
error: Content is protected !!