…अन् आंदोलनस्थळीच महिला कर्मचाऱ्यांनी केले हरितालिकेचे पूजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूचः संवादाअभावी तोडगा नाहीच

 

अमरावती: कंत्राटी नोकरीऐवजी कायमस्वरुपी नोकरी द्या, या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन आठवड्याभरानंतरही सुरूच आहे. मंगळवारी पवित्र हरितालीकेच्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांनी चक्क आंदोलनस्थळीच पूजन व आरती केली.

आयटकशी संबंधित आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी एकत्रिकरण समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जि. प. च्या प्रवेशद्वारासमोर गेल्या ८ दिवसांपासून मोठ्या निर्धाराने कर्मचारी धरणे आंदोलन करीत आहेत. सोमवारी सकाळी या आंदोलनकर्त्यांनी जि.प. कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चाही काढला. मोर्चाचे नेतृत्व अशोक कोठारी, डॉ. अंकुश मानकर, प्रीती पवार, मोनाली खांडेकर यांनी केले होते. प्रश्न धोरणात्मक असल्याने त्याचा निर्णय मंत्रालय पातळीवरच होऊ शकतो, जिल्हापातळीवर हा प्रश्न सोडविता येणार नाही, अशा भूमिकेत प्रशासन आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे.

जिल्हाभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्था विस्कळीत होत आहे.

आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. हरितालिका हा सण अत्यंत पवित्र समजल्या जातो. आंदोलन सुरू असल्याने महिलांनी आंदोलनस्थळीच पूजेचे साहित्य तसेच इतर सामुग्री एकत्रित करीत हरितालिकेचे पूजन केले, तसेच सामूहिक आरतीही म्हटली. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वारावर बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती. प्रशासनाला जाग यावी व आमच्या मागण्या मान्य व्हाव्या, अशी एकमुखी आर्जव या महिला आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!