मुंबई :प्रतिनिधी लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून आज राज्यभरासह जगभरात बाप्पाच्या भक्तांकडून गणरायाचं स्वागत केलं जात आहे. घरोघरी मोठ्या भक्तिभावाने बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. मुंबई-पुण्यातील रस्त्यांवर लहान-मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकांचा उत्साह दिसून येत आहे. गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना दिली जात आहे. जंगी मिरवणुकांमधून बाप्पांच्या आगमनाची ग्वाही दिली जात आहे. मुंबईत लालबागचा राजा विराजमान झाला असून पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेही आगमन झाले आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 72





