वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी भाजपाचे आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पदाधिकाऱ्यांनी केली मर्क्युरी टी- पॉइंटवर प्रशासनाशी चर्चा

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी डॉ. नितीन धांडेचा पुढाकार

 

अमरावतीः शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी डॉ. नितीन धांडे यांनी पुढाकार घेत या वाहतूक कोडीतून सुटका कोडीतून सुटका करण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मर्क्युरी टी-पॉइंटवर आंदोलन करीत प्रशासनाशी चर्चा केली.

शहरांमधील रेल्वेस्टेशन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल या तीनही मुख्य भागांना जोडणारा आणि अतिशय जुना अगदी १९६३ मध्ये बांधलेला रेल्वे ओवर ब्रिज हा स्ट्रक्चरलदृष्ट्या पूर्णतः धोकादायक झालेला असून काही दिवस आधी या पुलावरून पूर्ण जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली होतीः मात्र दोन दिवस आधी प्रशासनाने या पुलावरून आता पूर्णतः वाहतूक बंद केली आहे.

मात्र गणेशोत्सवाचा सण आहे, पुढे नवदुर्गा उत्सव दसरा आणि दिवाळी सारखे मोठे उत्सव आहेत, अशा एन उत्सवाच्या वेळी अमरावतीकरांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे.

याच विषयाला धरून मंगळवारी भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने अरविंद चौक डॉ. पंजाबराव देशमुख बँकेजवळ मनपा तथा पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी चर्चा केली आणि या उत्सवाच्या काळामध्ये अमरावतीकर जनतेला कोणताही त्रास किंवा त्यांची वाहतूक कोंडी होऊ नये. त्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली..

यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तथा पोलिस विभागाने याबाबत लवकरच निर्णय घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था उभी केली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी करताना भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ नितीन धांडे यांच्यासह सरचिटणीस, ललित समदूरकर, बादल कुलकर्णी, राधा कुरील, महिला मोर्चा अध्यक्ष सुधा तिवारी, युवामोर्चा अध्यक्ष विकी शर्मा, मंडळ अध्यक्ष सचिन नाईक, प्रफुल्ल बोके, छोटू वानखडे, मनीष चौबे, संतोष कावरे, उमेश निलगिरे, भारती गुहे, तसेच प्रवीण वैश्य, मिलिंद बांबल, शैलेंद्र मिश्रा, अमृत यादव, राजेश आखेगावकर, भारत चिखलकर, मनोज काळे, शैलेंद्र मेघवानी, आकाश पाटील, तुषार वानखडे, सुधीर वाघ, सुमित कलाने, सुधीर थोरात, विवेक चुटके, राजू राजदेव, आत्माराम पुरसवाणी, प्रमोद राऊत, श्याम पाध्ये, किशोर जाधव आदी भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!