गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोकणासाठी एक महत्वाची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिलीय.
मुंबई : कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोकणासाठी एक महत्वाची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिलीय. रो-रो बोट सेवा चालू करण्याची मूळ संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. समुद्राच्या मार्गातून आपण कोकणात जाऊ, यासाठी त्यांनी 2014 साली मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होतंय, याचा मला आनंद आहे. त्यामुळं मुंबई ते सिंधुदुर्ग आणि मुंबई ते रत्नागिरी M2M नावाची रो-रो बोट सेवा 1 किंवा 2 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे,” अशी मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी (26 ऑगस्ट) दिलीय.
1 किंवा 2 तारखेला रो-रो सेवा सुरु होणार : नितेश राणे यांनी सांगितलं की, “या रो-रो सेवेसाठी केंद्रीय मंत्रालयाकडून सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत. त्याचं माझ्याकडे पत्र आहे. रो-रो बोटसाठी ज्या परवानग्या आवश्यक असतात. त्या 147 सर्व परवानग्या मिळावल्या आहेत. तसंच ही बोट 25 नॉट्स इतक्या वेगानं धावणार आहे. दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी रो-रो बोट असणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग आणि मुंबई ते रत्नागिरी अशी रो-रो बोट सुरु करण्याची परवानगी मिळालीय. आमची ही रो-रो बोट कोकणाच्या दिशेने जाण्याच्या मार्गानं सज्ज आहे. पण सध्या खराब हवामान आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं थोडे दिवस थांबवली आहे. पावसाचे वातावरण पुढील काही दिवस ढगाळ वातावरण असणार आहे, असं हवामान खात्यानं म्हटलंय. त्यामुळं आम्ही कोणतीही जोखीम घेतली नाही. पण सप्टेंबर महिन्यात 1 किंवा 2 तारखेला रो-रो सेवा सुरु करणार आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं.
- मुंबई, भाऊचा धक्का ते रत्नागिरी साडेतीन तास लागणार.
- मुंबई, भाऊचा धक्का ते सिंधुदुर्ग पाच तास लागणार.
- M2M ही प्रिन्सिस बोट अतिशय वेगवान आहे.
- फ्सर्ट क्लास, बिझनेट, एकॉनॉमी आणि प्रिमियम क्लास अशी तिकिटांची कॅटेगिरी असणार.
- पहिला थांबा जयगड (रत्नागिरी) व दुसरा थांबा विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) असणार.
- ट्राय रन पुढील पाच दिवसात करणार.
तिकिटांचे दर किती रुपये असणार?
- फ्सर्ट क्लास – 9000 हजार रुपये
- बिझनेस क्लास – 7500 हजार रुपये
- प्रिमियम क्लास – 4000 हजार रुपये
- एकॉनॉमी क्लास – 2500 हजार रुपये
– विशेष म्हणजे, या रो-रो बोटमधून सायकल, दुचाकी, चारचाकी, मोठी बस इत्यादी वाहने देखील घेऊन जाऊ शकतो. याचे सुद्धा तिकिट आकारण्यात येणार आहे.
वाहनांचे तिकिट दर कसे असणार?
- चारचाकी वाहनासाठी 6000 हजार रुपये
- दुचाकीसाठी 1000 हजार रुपये
- सायकलसाठी 600 रुपये
- मिनी बससाठी 13000 हजार रुपये
- 30 सिटर बसेससाठी 14500 हजार रुपये
- 45 सिटर बसेससाठी 17000 हजार रुपये
45 सिटरपेक्षा अधिक बसेससाठी 21000 हजार रुपये
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





