– सचिन इंगळे (प्रतिनिधी) : कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चिखलदरा व अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रानभाजी महोत्सव संपन्न झाला.
या महोत्सवात मेळघाटातील विविध रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल लावण्यात आले होते. यात चवळी, अंबाडी, बांबू, कटूले, मटाळू, तरोटा, अडूची पाने, कुंजीर, आघाडा, केना इत्यादी स्थानिक रानभाज्यांचा समावेश होता. माविम, उमेद तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही विविध स्टॉल्स लावून महोत्सवात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला मा. श्री. सातव सर (उपविभागीय कृषी अधिकारी), अचलपूर येथील तहसीलदार, श्री. अक्षय क्षीरसागर (तालुका कृषी अधिकारी, अचलपूर), श्री. भारसाकळे सर (तालुका कृषी अधिकारी, चिखलदरा), श्रीमती. कडू मॅडम (केवीके, अमरावती) यांच्यासह आत्मा टीम, सहायक कृषी अधिकारी तसेच अचलपूर व चिखलदरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गट शेती प्रीमियर लीगमधील शेतकरी गटातील सदस्यांनीही स्टॉल लावले व भेट दिली. तसेच फार्मर कप संदर्भात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





