अंजनगाव सुर्जी येथे घाणीचे साम्राज्य;प्रशासकीय राजवटीत नागरिक त्रस्त, कंत्राटदाराला वरदहस्त?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी – नगरपरिषदेत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व आरोग्य अधिकारी मिलिंद वानखडे यांच्या निष्क्रियतेमुळे शहरात आणि डंपिंग डेपो परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, कोणतेही टेंडर न काढता एका ठराविक कंत्राटदारालाच पुन्हा पुन्हा काम देण्यात येत असून, दरमहा १५ ते २० लाख रुपये खर्चूनही स्वच्छतेची दयनीय अवस्था आहे. अंजनगाव ते अकोट राष्ट्रीय महामार्गालगतच्या डंपिंग डेपोवर प्रचंड कचऱ्याचा ढिग साचून दुर्गंधी पसरली आहे. पावसामुळे महामार्गावर घाणीचे पाणी वाहत असून, वाहन अपघातांची शक्यता वाढली आहे.

नागरिकांना डंपिंग डेपोजवळून जाताना नाकावर रुमाल बांधून जावे लागत आहे. यामुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले असून, नगरपरिषदेची बेफिकिरी उघड झाली आहे.

आरोग्य अधिकारी मिलिंद वानखडे यांनी सांगितले की,

> “पावसाळ्यामुळे डंपिंग क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर मार्ग तयार करून समस्या सोडवली जाईल.”

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!