-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : भारतीय जनता पार्टी अंजनगाव सुर्जी शहर मंडळाच्या वतीने मनीष मेण यांच्या नेतृत्वाखाली ढोमणपुरा हनुमान मंदिर सभागृह येथे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीमध्ये मेळघाट जिल्हा सरचिटणीस गोपाल चंदन, जिल्हा सरचिटणीस सुधीर रसे, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ. विलास कविटकर, नवनिर्वाचित ओबीसी मेळघाट जिल्हाध्यक्ष पदमाकर सांगोळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई मालठाणे तसेच माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांचा समावेश होता.
बैठकीत नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकाऱ्यांचा व नुकतेच पक्षप्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी गणेश पिंगे, संजय नाठे, माजी शहराध्यक्ष उमेश भोंडे, प्रफुल होरे, संजय टिपरे, महिला शहराध्यक्षा हेमाताई लेंदे, विद्या घडेकार, सुवर्णा सरोदे, दुर्गे गुरुजी, राजेंद्र रेखाते, विक्रम पाठक, आशिष टिपरे, प्रविन पटुकले, देवानंद टांक, सुनील बेराड, श्याम गुजर, गौरव चांदुरकर, सौरभ जूनगरे, रुपेश बुंदीले, देवेंद्र नेमाडे, निलेश पाटील बारी तसेच अनेक आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





