अंजनगाव सुर्जी येथे गणरायाचे आगमन उत्साहात;पावसातही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहिला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : श्री गणरायाचे आगमन अंजनगाव सुर्जी शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही गणेशभक्तांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात बाप्पाचे शहरात आगमन झाले. शुभमुहूर्तावर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणरायाची स्थापना करण्यात आली. शहरात सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती स्वरूपातही मोठ्या संख्येने बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनामुळे शहरातील बाजारपेठाही बहरल्या होत्या.
गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अंजनगाव सुर्जी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!