अंजनगाव सुर्जी शहरात वाढती वाहतूक कोंडी; वाहतूक सिग्नल बसविण्याची सामाजिक कार्यकर्ते गिरीश लोकरे यांची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शहरातील वाढती लोकसंख्या व वाहनांच्या झपाट्याने वाढलेल्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचे मोठे संकट उभे राहिले आहे. शहराच्या मध्यातूनच राष्ट्रीय महामार्ग गेल्याने शहर दोन भागांत विभागले गेले असून वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी ठरली आहे.
महामार्गालगत दर्यापूर, अकोला व अमरावती या राज्य मार्गांचा संगम असल्याने वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. एकीकडे नवीन कॉलनी, विद्युत वाहिनी विभाग, पेट्रोल पंप, बसस्थानक, शासकीय कार्यालये व रुग्णालयांकडे जाणारे रस्ते असून, दुसरीकडे कृषी कार्यालय, शाळा- महाविद्यालये, मार्केट व ग्रामीण भागाकडे जाणारे रस्ते आहेत. परिणामी वाहनचालकांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
डी. पी. रोड, पान अटाई चौक, टाकरखेडा चौक, बाजारपेठ परिसर, शाळा व दवाखान्याजवळ दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. बेशिस्त वाहनचालक व वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे छोटे-मोठे अपघात घडत असून सर्वसामान्य वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण रुग्णालयात रुग्ण नेताना ॲम्ब्युलन्स चालकांनाही मोठा अडथळा निर्माण होतो. या समस्येकडे वाहतूक पोलीस व पोलीस निरीक्षकांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक सिग्नल बसविणे अत्यावश्यक असल्याने सामाजिक कार्यकर्ते गिरीश लोकरे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!