रक्तदान शिबिराचेही आयोजन
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद अमरावती यांच्या वतीने “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे १९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध आरोग्य तपासणी शिबिरे सुरू आहेत.
या कालावधीत रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंतरोग तपासणीसह स्तन व गर्भाशय मुख कर्करोग, मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल आजार, रक्तक्षय तपासणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून विशेष सल्ला व मार्गदर्शन मिळणार असून स्थानिक व क्षत्रिय आहाराला प्रोत्साहन, गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषण आहार, मासिक पाळी स्वच्छता, माता-बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृवंदन योजना नोंदणी, आयुष्यमान कार्ड योजना याबाबतही माहिती व सेवा दिल्या जात आहेत.
दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.
या अभियानाचा लाभ मोठ्या संख्येने महिलांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेघा गिऱ्हेपुंजे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदांत टांक, डॉ. मृणाल मोहोड, डॉ. अक्षय रेखाते, डॉ. वैष्णवी काकड, डॉ. साकिब शेख, डॉ. तरुण पटेल, डॉ. सुवर्णा बिहाडे, डॉ. शाहिद, डॉ. जुनेद, डॉ. बढीये व डॉ. धाकडे यांनी केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





