अंजनगाव सुर्जी येथे मुसळधार पावसाने ‘स्वप्न नगरी’ व ‘गजानन नगर’ जलमय, प्रशासनावर संताप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव नगर परिषद हद्दीतील ‘स्वप्न नगरी’ आणि ‘गजानन नगर’ या दोन प्रमुख वस्त्यांमध्ये २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसर अक्षरश: तलावाच्या स्वरूपात रूपांतरित झाला. नगर परिषदेकडून सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थेचा अभाव असल्याने पाणी रहिवाशांच्या घरांच्या उंबठयांपर्यंत शिरले. या घटनेमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील रहिवासी नगर परिषदेकडे सांडपाणी वाहून जाण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. अनेक निवेदने दिल्यानंतरही प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली नाहीत. रहिवाशांच्या मते, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करणे आणि नवीन कॉन्क्रीट नाल्या बांधणे गरजेचे होते, परंतु ही कामे झालेली नाहीत.

परिसरात शिरले पाणी, मोठे नुकसान आज दुपारी सुमारे १.३० वाजता झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. पाणी हळूहळू घरांमध्ये शिरल्याने घरातील वस्तू भिजल्या, तसेच काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. लहान मुले व वृद्ध नागरिक या परिस्थितीत घराबाहेर पडू शकले नाहीत, ज्यामुळे नागरिकांना गंभीर गैरसोय भोगावी लागली.

प्रशासनावर कारवाईची मागणी घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एका संतप्त नागरिकाने सांगितले, “आमच्या निवेदनांना कचऱ्याची टोपली दाखवली गेली.” नागरिकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांना आशा आहे की, प्रशासन या घटनेतून धडा शिकून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस पाऊले उचलेल.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!