डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शहरात व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणासह नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार सुरज बोंडे यांना निवेदन सादर केले.

सण-उत्सव तसेच विविध मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून, त्याचा आवाज परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने लहान मुले, वृद्ध, हृदयविकाराचे रुग्ण आणि इतर आजारांनी ग्रस्त नागरिक यांना गंभीर आरोग्य समस्या उद्भवत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ऐकण्याची क्षमता कमी होणे, मानसिक ताण वाढणे, रक्तदाबाच्या समस्या वाढणे आणि झोपेचा भंग होणे यांसारखे परिणाम दिसून येत असल्याचेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या डीजेमुळे नागरिकांच्या शांततेचा भंग होत असल्याने सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. या कारवाईमुळे शहरात शांतता प्रस्थापित होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला.

निवेदन सादर करताना पवन सारडा, सचिन जायदे, पत्रकार अशोकराव पिंजरकर, पत्रकार जयेंद्र गाडगे, ब्रिजमोहन झवर, आनंद संघई, देवानंद महल्ले, नानाभाऊ शिंदे जामेकर, संजय धारस्कर, संतोष गोलाईत, संदीप राठी, विजय नांदेकर, प्रकाश चांडक, पारीख, नितीन कवीटकर, रेखाते आदी उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!