संत श्री.आसारामजी बापू आश्रमात पार पडला भव्य दिव्य सामूहिक श्राद्ध व तर्पण विधी सोहळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

— सचिन इंगळे; अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी- पथ्रोट येथील संत श्री.आसारामजी बापू आश्रम, शिंदी रोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वपितृ अमावास्येनिमित्त भव्य सामूहिक श्राद्ध व तर्पण विधीचे आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक सोहळ्यासाठी स्थानिक ब्राम्हणांसह अहमदाबाद आश्रमातील अखंड ब्रह्मचारी ब्राम्हणांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. संपूर्ण विधी शास्त्रसम्मत पद्धतीने पार पडला. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण केली.

या वर्षीचा सोहळा सकाळी ७.३० वाजता विधीपूर्वक मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. विविध धार्मिक क्रियाकलापांनंतर दुपारी १ वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. ब्राम्हण भोजनानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी प्रसाद भोजनाचीही उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.

या पवित्र कार्यक्रम चे आयोजन श्री.योग वेदांत सेवा समिति, पथ्रोट, अंजनगाव सुर्जी,परतवाडा यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली करण्यात आले. भाविकांनी पुढील वर्षी अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले याच प्रमाणे असे कार्यक्रम संपूर्ण भारतात ९० आश्रमात उत्तम व्यवस्था करून मोठ्या उस्ताहात पार पडले.
या कार्यक्रमाची सविस्तर माहिती साधक विजयजी गुहे यांच्याकडून देण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!