३१ ऑक्टोबर डेडलाइन : ‘सीसीआय’साठी कपास किसान मोबाइल अॅपचा वापर, पात्या, बोंडाची गळ, आता बोंडसळने वाढवली शेतकऱ्यांची चिंता
अमरावती : सततचा पाऊस, ढगाळ वातावरणाने यंदा कापसाचा हंगाम लांबला आहे. अशा परिस्थितीत ‘सीसीआय’साठी कपास किसान अॅपद्वारे नोंदणीची मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. आता ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षी भारतीय कापूस महामंडळांद्वारा (सीसीआय) द्वारा हमीभावाने कापसाच्या खरेदीसाठी कपास किसान हे मोबाइल अॅप सुरू केले आहे व त्याद्वारे १ सप्टेंबरपासून कापसाची नोंदणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणीसाठी ३० सप्टेंबर डेडलाइन देण्यात आली होती; मात्र या अवधीत शेतकऱ्यांजवळ कापूस नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांसह राज्य शासनाने केंद्रांकडे विनंती केली होती. त्यानुसार नोंदणीला आता ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
दरवर्षी नवरात्रात, दसऱ्याला खासगी संस्थांद्वारा कापूस खरेदी सुरू होत असते.
यंदा मात्र तशी स्थिती नाही. दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण, सतत पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे कपाशीवर कीड रोगांचा अटॅक झाला. कपाशीची पाने पिवळी पडली, पात्याची व बोंडाची गळ होत आहे.
त्यातच बोंडसळ होऊन बोंड सडत आहेत. शिवाय काही भागात बोंडअळीचा अटॅक झालेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कापसाची बोंडं फुटत नसल्याने शेतकऱ्यांची सीतादही झालेली नाही. त्यामुळे नोंदणीच्या मुदतवाढीने दिलासा मिळाला आहे.
बोंड फुटण्यासाठी ताण आवश्यक दोन महिन्यात कपाशीला पावसाचा ताण मिळालेला नाही, सततचा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीची वाढ थांबली व बॉड फुटत नाही. त्यामुळे कपाशीचा किमान आठ ते दहा दिवस पावसाचा ताण आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
‘एचटीबीटी’चा फटका, यंदा उत्पादनात घट यावर्षी जिल्ह्यात प्रतिबंधित ‘एचटीबीटी’ची मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे. याला वेळीच आवर घातला गेल्याने यंदा सरासरी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याची माहिती कृषीतज्ज्ञ पवन देशमुख यांनी दिली. त्यातच प्रतिकूल परिस्थितीमुळे कापसाचा हंगाम लांबणीवर पडला आहे. पात्या व बोंडगळ व आता बॉडसळीचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





