गोंडवाना विद्यापीठाच्या ‘छत्रपती शाहू महाराज अध्ययन समिती’वर प्रा. प्रेमकुमार बोके यांची निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : समाजातील वंचित, शोषित घटकांच्या मुक्तीसाठी आयुष्यभर कार्यरत राहून पुरोगामी विचारांची मशाल पेटवणारे आणि महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, राजमाता जिजाऊ आदी महान संत-महापुरुषांच्या विचारांचा सातत्याने प्रचार-प्रसार करणारे शांत, सयमी व समर्पित व्यक्तिमत्त्व प्रा. प्रेमकुमार बोके यांची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या *‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज अध्ययन समिती’*वर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

पुरोगामी चळवळीतील मानाचे स्थान

प्रा. बोके हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, विचारवंत, नामवंत लेखक व प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. तसेच ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते असून गेल्या अनेक वर्षांपासून पुरोगामी विचारसरणीला समाजात दृढमूलं रोवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
व्याख्यानमाला, लिखाण आणि प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य युवकांना जागृत केले. त्यांच्या विचारवंत, निर्भय आणि निष्पृह कार्यशैलीमुळे सामाजिक न्याय, बंधुता व समानतेबाबतची जाणीव महाराष्ट्रात पसरली आहे.

निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव

गोंडवाना विद्यापीठाच्या या महत्वाच्या समितीवर झालेली प्रा. बोके यांची निवड ही पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद घटना ठरत आहे. राज्यभरातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आभारप्रदर्शन व संकल्प

या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना प्रा. बोके यांनी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व पुरोगामी चळवळीतील प्रख्यात व्यक्तिमत्त्व मा. दीपक धोपटे, सिनेट सदस्य प्रा. डॉ. दिलीप चौधरी तसेच सर्व स्नेहीजनांचे मनःपूर्वक आभार मानले.
“ही निवड माझ्यासाठी सन्मानासोबतच जबाबदारीचे पद आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या कार्याचा वसा घेऊन विद्यापीठाच्या माध्यमातून समानतेची व समतेची चळवळ अधिक व्यापकपणे पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,” असे प्रा. बोके यांनी सांगितले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!