सेवाभावी वृत्ती, शिस्तप्रियता व प्रामाणिकपणासाठी सहकाऱ्यांकडून गौरव
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : श्रीनाथ विद्यालयात दीर्घकाळ सेवा बजावून संस्थेच्या प्रगतीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या श्रीमती नलिनी सुखदेव इंगळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी, माजी विद्यार्थी व मान्यवरांची उपस्थिती होती.
वक्त्यांनी आपल्या भाषणात श्रीमती इंगळे यांच्या सेवाभावी वृत्तीचा, विद्यार्थ्यांशी असलेल्या आत्मीयतेचा व सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याच्या नात्याचा गौरव केला. “त्यांनी कार्यकाळात शिस्त, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता यांचा उत्तम आदर्श ठेवला,” असे मत शिक्षकवर्गाने व्यक्त केले.
आपल्या मनोगतात श्रीमती इंगळे यांनी विद्यालयाशी असलेले घट्ट नाते, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “ही शाळा माझ्यासाठी कुटुंबासारखी होती. येथे मिळालेल्या सहवासाच्या आठवणी आयुष्यभर हृदयात राहतील,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी निरोपाचा क्षण व्यक्त केला.
ह्यावेळी श्रीनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किर्ती चौधरकर, शिक्षिका पुष्पा सावरकर, तरूण धुर्वे सर, श्रीकांत झापर्डे सर,अशोक रायबोले,सुदाम घटारे, सोमनाथ रोकडे, सत्यजीत जोशी,भारसाकडे,रोकडे मॅडम,येवले मॅडम, नामदेवराव गवई,नंदू गवई,पंकज हिरूळकर, सचिन इंगळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पुष्पा सावरकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका सौ किर्ती चौधरकर यांनी केले. शेवटी उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सुखसमृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





