भाजप कार्यकर्ते अनिल गौर यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रम संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

सचिन इंगळे अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी; अंजनगाव सुर्जी : भाजप कार्यकर्ते अनिल शामलालजी गौर यांच्या बुधवारा सुर्जी येथील निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात* कार्यक्रमाचे टिव्हीवर थेट प्रक्षेपण ऐकवण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील भाजपा कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी पंतप्रधानांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा मनापासून आस्वाद घेतला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, यावर भर देण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी विविध योजनांवर चर्चा केली व भावी उपक्रमाबाबत विचारमंथन केले.

कार्यक्रमाचे आयोजन निवासस्थानी एल.सी.डी वर अनिल शामलालजी गौर यांनी केले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारचे कार्यक्रम नियमित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!