पोषण माह कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. दर्यापूर अंतर्गत “पोषण माह” कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेचे चेक वाटप करण्यात आले तसेच पुस्तकाचे प्रकाशनही संपन्न झाले. यावेळी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना आमदार लवटे म्हणाले, “आई निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहते आणि कुटुंब निरोगी असेल तर समाज व राष्ट्र निरोगी राहते. त्यामुळे पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “आज लाभार्थ्यांना बँकेचे चेक देऊन सरकारच्या योजनांचा थेट फायदा हक्कदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही, तर त्या मदतीचा योग्य वापर होऊन आई व बालकांचे आरोग्य सुधारले पाहिजे हे अधिक महत्त्वाचे आहे.”

कार्यक्रमाला गटविकास अधिकारी ढवक, बालविकास प्रकल्प अधिकारी मेरघड, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरावती मा. महेंद्र दिपटे, शिवसेना शहरप्रमुख दर्यापूर गोपाल अग्रवाल, जाधव, पुरी, प्रशांत अढाऊ, प्रशांत तांबळे तसेच शिवसेना-युवासेना पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, सहायिका, लाभार्थी महिला, लहान मुले व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!