-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, अंजनगाव सुर्जी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेघा गिरीपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गजानन लवटे व तहसीलदार पुष्पाताई सोळंके यांच्या हस्ते संपन्न झाले. शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर तालुक्यातील सुमारे २५० महिलांनी विविध आजारांच्या तपासण्या करून घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
शिबिरात डॉ. तरूण पटेल, डॉ. तराळ, डॉ. प्रीती दुबे, सुरेश गावंडे, स्वाती सोनवणे, डॉ. गिरीश, डॉ. शुभम, डॉ. कविता, डॉ. सोनाली (ब्लड बँक युनिट धारणी) तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रेखाते, डॉ. टांक, डॉ. साकिब शेख, डॉ. बिहाडे, डॉ. मोहोळ व डॉ. काकड यांनी आरोग्यसेवा पुरवली.
कार्यक्रमाचे संचालन मंगेश पाटणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुवर्णा बिहाडे यांनी मानले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





