अमरावती : हमालपुरा भागामध्ये एका मेडिकल व्यावसायिकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये पवन लढ्ढा हे गंभीर जखमी झाले. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री प्राणघातक अज्ञातांविरुद्ध हल्ल्याचा गुन्हा नोंदवला.
पवन लढ्ढा हे मेडिकल व्यावसायिक असून, शुक्रवारी रात्री ते चिंचफैल येथे दुचाकीने जात होते. त्यावेळी हमालपुरा भागातील देवीच्या मंदिराजवळ गर्दी जमली होती. तर रस्त्यावर दोन ते तीन मुले रहदारीला अडथळा होईल, अशा प्रकारे उभी होती. लढ्ढा यांनी त्यांना बाजूला होण्यास बजावले. त्याच वेळी ती मुले त्यांच्या अंगावर धावून आली. २५ ते ३० वर्षे वयोगटातील त्या तीन मुलांपैकी एका तरुणाने त्याच्याकडे असलेल्या चाकूने पवन यांच्या हात, पाय तथा डोक्यावर चाकूने वार केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 113





