दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुस्लिम महिलांनी काढली हिंदू महिलांना मेहंदी, मर्जिया पठाण यांनी दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुस्लिम महिलांनी हिंदू महिलांच्या हातावर मेहंदी काढली. राष्ट्रवादीच्या नेत्या मर्जिया पठाण यांनी मेहंदीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.

 

ठाणे – कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही, असा दुष्प्रचार करीत काही हिंदूत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी तसंच सामाजिक समानता अबाधित राहावी, या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली.

मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र, मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये, असे म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता. तसंच, अनेक दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केले होते. मुंब्रा येथील डायमंड हाॅलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेहंदी सेमिनारमध्ये शेकडो हिंदू-मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा संदेश दिला.

मुंब्रा भागात सामाजिक एकोपा एक आदर्श – देशात अनेक संघटना हिंदू मुस्लिम असा वाद पेटवण्याचा प्रयत्न करत असताना मुंब्रा परिसरात काही संघटना हिंदू मुस्लिम एकोपा टिकून राहावा यासाठी काम करत आहेत. मुस्लिम समाजातील या संघटना करत असलेल्या या सामाजिक प्रबोधनामुळे देशात चांगला आदर्श ठेवता येऊ शकतो त्यामुळे कितीही वादग्रस्त विधाने झाली तरी इथे वाद होत नाही. यामुळे देशातील मुस्लिम बहुल भागात अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचं मत मुंब्रा भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!