‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा आता सोशल मीडियावर ट्रोल होतं आहे. तिनं केलेलं माता सीताचं लूक यूजर्सला आवडलं नाही.
मुंबई – सोशल मीडिया सेन्सेशन ”कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये ती माता सीताच्या लूकमध्ये असल्याची दिसत आहे. आता यामुळं तिला सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल करत आहेत. आता परत अंजली अरोरा ही सोशल हायलाईट होत आहे. सध्या अंजली म्युझिक व्हिडिओ आणि अभिनयात तिचे नशीब आजमावत आहे. तिचा शेवटचा म्युझिक व्हिडिओ ‘दिल पर चली चुरियां’ हा खूप गाजला होता. हे गाणं अनेकांना पसंत पडलं होतं. आता ती ‘१९२०’ या चित्रपटामधील अभिनेता रजनीश दुग्गलबरोबर ‘श्री रामायण कथा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती माता सीताची भूमिकेत दिसेल.
‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा झाली ट्रोल : या चित्रपटामध्ये अंजली अरोरा आणि रजनीश दुग्गल व्यतिरिक्त निर्भय वाधवा, देव शर्मा आणि शील वर्मा हे कलाकार देखील दिसणार आहेत. दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अंजलीचा लूक हा पौराणिक आहे. यामध्ये ती केशरी साडी, केसांमध्ये सिंदूर आणि कपाळावर टीकली लावल्याची दिसत आहे. या लूकवर तिनं खूप कमी मेकअप केला आहे. आता अनेकजण सोशल मीडियावरून तिचा फोटो काढण्यास सांगत आहे. अंजलीच्या पोस्टवर एक यूजरनं लिहिलं, ‘तिला सीता बनवणे हा खूप मोठा अपमान आहे.’ दुसऱ्या एकानं लिहिलं, ‘कलियुगाचा काळा युग सुरू झाला आहे. आम्ही तिला सीता माताच्या भूमिकेत सहन करणार नाही.’ आणखी एकानं लिहिलं, ‘घोर कलयुग आहे.’
अंजली अरोराबद्दल : दरम्यान अंजली अरोरा ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर डान्स केल्यामुळं सोशल मीडियावर एक रात्रीमध्ये स्टार बनली होती. यानंतर तिनं कंगना राणौतच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती मुनावर फारुकीमुळं खूप चर्चेत आली होती. याशिवाय ती एका एमएमएस लीकमुळेही चर्चेत आली होती. अंजली अरोरा ही अनेकदा आरशासमोर नाचून व्हिडिओ बनवते आणि ते ती सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय तिला अनेकजण तिच्या व्हिडिओमुळं सोशल मीडियावर ट्रोल करतात. आता अंजली अरोराचा ‘श्री रामायण कथा’ हा चित्रपट कधी येईल याबद्दल अधिक माहिती समोर आली नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





