किसनपूर येथे धान कापणी मशीनवर कार धडकली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तरुणाचा जागीच मृत्यू, दोन जखमी

मोहाडी  : ट्रॅक्टरला जोडून असलेल्या धान कापणी मशीनला भरधाव वेगात असलेल्या कारने जबर धडक दिली. यात तरुण जागीच ठार झाला. तर इतर दोघे जखमी झाले. हा अपघात मोहाडी तालुक्याच्या किसनपूर लहान गावाजवळील रस्त्यावर घडला. सागर दिनेश मुरबले असे मृताचे नाव आहे.

ट्रॅक्टरवर बसलेले पंजाबी आणि अभिषेक सुरचंद बिसेन दोन जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी वडेगाव येथील रुग्णालयात दाखल करून पुढे गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. माहितीनुसार सूरचंद बिसेन हे ट्रॅक्टरला जोडलेली आपली धान कापणी मशीन घेऊन तिरोडा तालुक्यातील वडेगावकडे जात होते.

वडेगाव नाल्याजवळ मशीन असलेला ट्रॅक्टर फेल पडला. मशीनसह ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा होता. साकोलीकडून येणार्‍या एम.एच.३३/ए ३७१३ क्रमांकाच्या कारने ट्रॅक्टर व मशीनला जबर धडक दिली. या  धडकेत ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये सागर मुरबले दबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!