–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटी (ग्रामीण व शहर) यांच्या वतीने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात भाकर-बेसन चटणी जेऊन “काळी दिवाळी” करून निषेध नोंदविण्यात आला.
या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील दाळु, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप भाऊ देशमुख, दर्यापूर विधानसभेचे प्रभारी प्रशांत भाऊ पाचडे, तसेच रामेश्वर भाऊ अभ्यंकर, विलास भाऊ पवार, राहुल पाटील, सुधाकर खारोडे, निखिल कोकाटे, अजय डीके, सतीश हाडोळे, राजू शेठ कुरेशी, किस्मत अली, विनय मानकर, हेमंत येवले यांच्यासह बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.
शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी गजानन पाटील दुधात, श्रीधर धांडे, जमीर भाई, ओम तायडे, मधुकर इंगळे, तेजस अभ्यंकर यांसह अनेक शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते देखील या निषेधात सहभागी झाले. उपस्थितांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध आपला रोष व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






