“दर्यापूर तालुक्यात तांडा वस्त्यांमध्ये ₹६० लक्ष विकासकामांचे भूमिपूजन”.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : रामगाव, पेठ इतबारपूर, लेहेगाव, सोनखास (लेहेगाव), एरंडगाव आणि रामतीर्थ येथील तांडा वस्त्यांमध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. खासदार बळवंत वानखडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ₹६० लक्ष निधीमुळे गावकरी आता सुधारित रस्त्यांचा लाभ घेणार आहेत.

सहभागींमध्ये आमदार गजानन लवटे, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, माजी जि.प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सभापती सुनिल गावंडे, माजी पं.स. सभापती प्रदीप देशमुख, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या विकासकामांमुळे गावातील वाहतूक सुविधा सुधारेल आणि रहिवाशांसाठी जीवनमान उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!